महिला स्वतः सक्षम होऊन दुसऱ्यांना सक्षम करतात : डॉ. संपदा नासरी

478

– डेहराडून येथील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठात पूर्व परिषदेचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली : महिलांच्या कृतीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. भारत कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागाला आपल्या देशात जे स्थान आहे, जी संस्कृती आहे ती भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक प्रदेशाने स्वतःची संस्कृती जपलेली आहे आणि त्यात महिलांचा फार मोठा वाटा आहे .जसे आपले सण आणि उत्सव आहे त्यामुळे ताण तणाव दूर होण्यास मदत होते. आपली संस्कृती ही ग्रामीण भागाने मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवली आहे आणि यात महिलांची भूमिका फार मोठी आहे. महिला स्वतः सक्षम होऊन त्या दुसऱ्यांना सक्षम करतात असे प्रतिपादन महिला महाविद्यालय नागपुर च्या डॉ.संपदा नासरी यांनी केले.
देहराडून येथील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठात पूर्व परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी “लोकसंस्कृती एक वैज्ञानिक संस्कृती “या विषयावर बोलतांना त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी या वेळी पीपीटी द्वारे अनेक उदाहरणे देऊन महिलांच्या सक्सेस स्टोरीज सांगितल्या.
देहरादून येथील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने ही पूर्व परीषद होत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे. यासाठी होणाऱ्या अनेक प्रयत्नापैकी हा एक प्रयत्न आहे. गोंडवाना विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठ , मुंबई आणि संवर्धिनी न्यास नवी दिल्ली सोबत आम्ही आयोजक आहोत. महिला ज्या ज्या क्षेत्रात पुढे जातात ते ते क्षेत्र ते आपल्या अस्तित्वाने उजळून टाकतात. याचा अर्थ असा नाही की पुरुष कुठे मागे असतात पण महिलांमध्ये जी क्षमता आहे की त्या ज्या क्षेत्रात जातात त्या क्षेत्राला ते वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाद्वारे सामाजिक समस्यांबद्दल जागरुकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्याकरिता “भारतीय स्त्री एक वास्तव दृष्टिकोन ” या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पूर्व परिषदेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आले होते यावेळी केले. सदर परिषदेचा मुख्य विषय होता . “लोकसंस्कृती मध्ये भारतीय महिलांची स्थिती “. या वेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे, महिला महाविद्यालय नागपूर च्या डॉ.संपदा नासेरी, केवल रामाणी महाविद्यालय नागपुर डॉ. माधवी मोहरील , शुभदा देशमुख , आम्ही आमच्या आरोग्यासाठी ,कुरखेडा , आणि पूर्व परिषदेच्या समन्वयक मीरा देसाई एस .एन. डी .टी. महिला महाविद्यालय मुंबई, या online पद्धतीने उपस्थित होत्या. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे अध्यक्षस्थानावरून बोलत होते .पुढे ते म्हणाले ,एक छान उदाहरण द्यायचे झाले तर आदिवासी महिलांचे देता येईल.
ज्या वेळेला ग्रामसभेमध्ये महिलांचा सहभाग हा चर्चिला गेला होता. त्या वेळी महिलांनी अतिशय नम्रपणे सांगितलं की आम्ही ग्रामसभेमध्ये न येण्याचे कारण काय तर पुरुषांचे वर्चस्व हा विषय नाही . तर ज्या पद्धतीने पुरुष तेथे दारु पीऊन येतात.हा गंभीर विषय आहे. त्यासाठी गावाने ठराव घेतला आणि निर्णय सर्वसंमतीने पारित केला . त्या पद्धतीची लोकशाही सर्व गावांनी अंगीकारली . ती नागरी भागातील लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी होती. ही ताकद या महिलांनी दाखवली. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देहरादून येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपले रिसर्च पेपर सादर करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी पूर्व परिषदेच्या समन्वयक डॉ. मीरा देसाई मार्गदर्शन करताना म्हणाल्या , देहरादून येथे होणारी आंतरराष्ट्रीय परिषद ही अशी पहिली परिषद आहे जिथे कोणत्याही भारतीय भाषेमध्ये रिसर्च पेपर लिहिता येतो. तो कसा लिहायचा, यासाठी विषय कसे घ्यायचे ,याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले केलं व सदर पूर्व परिषदेच्या उद्घाटनानंतर या परिषदेचे पहिले सत्र सुरू झाले.
“लोकसंस्कृती आणि निर्णय घेण्यात महिलांची भूमिका ” या विषयावर केवल रमाणी महाविद्यालय नागपूरच्या डॉ. माधवी मोहरील म्हणाल्या, महिला कुटुंबांमध्ये अनेक नातेसंबंध जपत अनेक क्षेत्रात भरारी घेतात. त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वामुळे घराला घरपण येत असते. आदिवासींच्या भारतात बऱ्याच भाषा आहे .भारतात आठ करोड आदिवासी लोक राहतात .प्रत्येक भाषेला स्वतःचे एक वेगळे असे स्वरूप आहे आणि प्रत्येकाचं स्वतःचं वेगळं कल्चर आहे. आदिवासी महिलांना पुस्तकी ज्ञान नाही तरीसुद्धा आपलं कल्चर ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देतात.
या परिषदेच्या दुसऱ्या सत्रात आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा डॉ.शुभदा देशमुख म्हणाल्या, आदिवासी, नृत्य प्रकार दुसऱ्यांसाठी नाही तर त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी ते करतात. प्रत्येक आदिवासी स्त्री साहित्यिक आहे. त्यांनी आपले काम करतानाचे अनेक अनुभव कथन केले. जोपर्यंत स्त्रिया एकत्र येत नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट यशस्वी होत नाही .ग्रामसभा हा इथल्या व्यवस्थेचा भाग आहे. मला आमच्या जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ हे आदर्श विद्यापीठ आहे असे म्हणावे वाटते.
या दोन्ही सत्रानंतर देहरादून येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत करिता आयोजक म्हणून समवर्धिनी न्यास ,नवी दिल्ली, डून विद्यापीठ देहरादून, एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्यात सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.
डॉ.प्रिया गेडाम ,डॉ. अनिरुद्ध गचके आणि डॉ.शैलेंद्र देव आणि वरभे यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची या पूर्व परिषदेचा लाभ घेतला.संचालन डॉ.रजनी वाढई यांनी तर आभार डॉ. रश्मी बंड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here