– धम्म परीषदेतील जनसागराला प्रबोधन
The गडविश्व
गडचिरोली,१६ नोव्हेंबर : डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला १९५६ ला बौद्ध म्हणून दिलेली ओळख येणाऱ्या जणगणनेत बौद्ध म्हणूनच करावी असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केले. ते दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व सत्यशोधक फाउंडेशन गडचिरोली च्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील राहूल सेलिब्रेशन लॉन येथे आयोजित धम्म परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणुन भन्ते डॉ. धम्म सेवक महाथेरो, बुद्धिस्ट सोसायटीचे राष्ट्रीय महासचिव अँड. बि. टी. शेंडे, राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते, नागपुर विभागिय अध्यक्ष विजय बन्सोड, जिल्हाध्यक्ष इंजि.नरेश मेश्राम, विभागीय उपाध्यक्ष अशोक इंदूरकर, विभागीय महिला प्रतिनिधी दर्शना शे दर्शना मेश्राम , यशोधरा नंदेश्वर , धम्मराव तानादु, धर्मानंद मेश्राम, काका गडकरी, विभा ऊमरे, हंसराज लांडगे , चंदुराव राऊत, प्रा.सुरेंद्र तावाडे उपस्थित होते.
यावेळी बुद्ध वंदनेने भन्तेजी द्वारे धम्म परिषदेची सुरुवात करण्यात आली. पुढे बोलताना राजरत्न आंबेडकर म्हणाले की, या देशात बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ज्या दिवशी धम्म दिक्षा दिली त्याच दिवशी महार, मांग, चांभार अन्य यासारख्या सर्व जाती नष्ट झाल्या, आता जे बौध्द झाले त्यांना जात राहिली नाही. आरक्षणाच्या फायद्यासाठी जे जात लिहतात ते बौद्ध होत नाही. म्हणून जनगणनेत बौद्ध म्हणुनच नोंद केली पाहीजे. तसेच संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आपली अर्थव्यवस्था, आपली शिक्षणव्यवस्था, आरोग्यव्यवस्था आपले व्यवसाय आपण निर्माण केले पाहीजे, त्यासाठी अशा धम्म परीषदा आयोजित झाल्या पाहीजे, तरच अशा धम्मपरिषदांचा उपयोग आहे असेही ते म्हणाले.
या दोन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रबोधन सत्र व सायंकाळी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी उद्घाटक म्हणून ब्रम्हपुरी येथील आंबेडकर महाविदयालयाच्या व्यवस्थापन सदस्या डॉ. स्मिता कांबळे, अध्यक्ष म्हणून बुद्धिस्ट सोसायटीचे प्रवक्ते धर्मानंद मेश्राम व मुख्य मार्गदर्शक म्हणून सामाजिक विचारवंत डॉ. युवराज मेश्राम, समुपदेशक विनोद गभने यांनी यथोचित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून रोहीदास राऊत, डॉ. कैलास नगराळे, स्मिता खोब्रागडे, अरविंद डहाट आदि उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान माळी समाज संघटनेचे अशोक मांदाळे, सुधा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलास नगराळे व जयश्री नगराळे, डॉ. यशवंत दुर्गे व खुशबू दुर्गे, निवृत्त तहसीलदार भास्कर बांबोळे, धम्मराव तानादु, दीपक बोलीवर, राज बन्सोड यांचा सापत्निक सत्कार करण्यात आला. सदर परिषदेला जिल्ह्यातील, तसेच विदर्भातून, छत्तीसगढ़ राज्यातून मोठ्या संख्येने युवा व धम्म बांधवानी हजेरी लावली होती. धम्म परिषदेचे संचालन अँड.सोनाली मेश्राम व सुरेश बांबोळकर व युवा महोत्सवाचे संचलन विभा उमरे यांनी, प्रास्ताविक सुधीर वालदे, राज बन्सोड यांनी तर आभार दर्शना शेंडे ,सचिन वैद्य यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बुद्धिस्ट सोसायटीचे विजय घागरगुडे , राहूल वनकर, प्रतिमा करमे, नूतन मेश्राम, नागसेन खोब्रागडे, ज्ञानोदय वाळके, बंडुभाऊ खोब्रागडे, दिगांबर पिल्लेवान, हेमंत मेश्राम, राधा नांदगाये, दीपक बोलीवार, वनिता बांबोळे, मिलिंद खोब्रागडे, प्रवृत्ती वाळके, पुनम भोयर, लता शेंद्रे, तसेच सत्यशोधक फाउंडेशनचे संयोजक राज बन्सोड, प्रतीक डांगे, विवेक बारशिंगे, सतीश दुर्गमवार, प्रितेश अंबादे अन्य सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
