पुराचा परीक्षांनाही फटका : गोंडवाना विद्यापीठाचा बी.एड अभ्यासक्रमाचा आजचा पेपर रद्द

367

– पुढील तारीख विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित होणार

The गडविश्व
गडचिरोली, १० ऑगस्ट : जिल्हयातील अतिवृष्टीचा परीक्षांनाही फटका बसला आहे. जिल्हयात अतिवृष्टीने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित असलेला आज १० ऑगस्ट रोजी असलेला बी.एड. अभ्यासक्रमातील हा EDUCATIONAL TECHNOLOGY & COMPUTER ASSISTED INSTRUCTION – SEM I & EDUCATION –SEM II पेपर रद्द करण्यात आला आहे असे विद्यापीठाचे प्र.उपकुलसचिव दिनेश नरोटे यांनी पत्राव्दारे कळविले आहे.

जिल्हयात दोन दिवस हवामान विभागामार्फत रेड अलर्ट जारी करण्यात आला होता तसेच आज ऑरेंज अलर्ट आहे. या कालावधीत जिल्हयात अतिवृष्टी झाली. अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे अनेक मार्गही बंद झाले आहे. याअनुषंगाने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गोंडवाना विद्यापिठाने आज १० ऑगस्ट रोजी असलेला बी.एड. अभ्यासक्रमाचा EDUCATIONAL TECHNOLOGY & COMPUTER ASSISTED INSTRUCTION – SEM I & EDUCATION –SEM II पेपर रद्द करण्याचे ठरविले आहे. पेपरची पुढील तारीख लवकरच विद्यापीठाच्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात येईल व त्यानुसार परिक्षा घेण्यात येईल असेही कळविले आहे.

बी एड अभ्यासक्रमातील दि १०/०८/२०२२ रोजी चा पेपर रद्द करण्याबाबत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here