नागपूर : एकाच घरात चौघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

234

The गडविश्व
नागपूर : येथील दयानंद पार्क परिसरातील एका घरात चार मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या ठिकाणी पती, पत्नी, दहा वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. पiत्नी आणि दोन्ही मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होते, तर पतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे पतीने पत्नी आणि दोन्ही मुलांची चाकूने हत्या करुन गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला जात आहे.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव मदन अग्रवाल असे होते. त्याचा चायनीज खाद्यपदार्थांचा स्टॉल होता. कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
बराचवेळ मदत यांच्या घरातून काही हालचाल नसल्याने शेजारच्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी त्यांच्या घरात जाऊन पाहिले असता समोरचे दृष्य पाहून त्यांना हादरा बसला. या घटनेची त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here