– रविवारी रात्री उशिरा नक्षल्यांच्या हल्ल्याने उडाली होती तारांबळ
The गडविश्व
बिजापूर : बिजापूरच्या कुत्रु पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोलिस कॅम्पवर नक्षल्यांनी हल्ला केल्याची घटना काल रविवार रात्रोच्या सुमारास घडली. सुमारे अर्धा चाललेल्या या चकमकीत चार जवान जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुत्रू भागातील दरभा येथे सीएएफ 4 थ्या बटालियनचा कॅम्प आहे. काल रविवारी रात्री उशिरा नक्षल्यांनी पोलिस कॅम्पवर अचानक हल्ला केला. नक्षल्यांनी पोलीस कॅम्पवर 10 BGL (बॅरल ग्रेनेड लाँचर) पेक्षा जास्त गोळीबार केला. यावेळी जवानांनाही प्रत्युत्तर देत गोळीबार केला. गोळ्यांचा आवाज ऐकून बॅरेकमध्ये झोपलेले सैनिकही जागे झाले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. जवानांचा वाढत दबाव पाहता नक्षल्यांनी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला. या चकमकीत २ सीएएफ आणि २ जिल्हा पोलीस दलाचे जवान जखमी झाल्याची माहिती आहे. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम वाढवण्यात आली आहे.बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, २ जवानांना हेलिकॉप्टरमधून रायपूरच्या राम कृष्ण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. दोन्ही जवानांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अन्य दोन जवानांवर विजापूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.