धानोरा : वन्यजिव सप्ताह कार्यक्रम संपन्न

195

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ६ ऑक्टोबर : येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचलित जे. एस. पी. एम .कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे प्राणिशास्त्र व वनस्पती शास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचा कार्यकमाचे आयोजन आज ६ ऑक्टोबर २०२२ ला करण्यात आले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण यांनी अध्यक्षाचे स्थान भूषविले तर विचार मंचावर डॉ.राजु किरमिरे, प्रा. डॉ. झाडे, प्राध्यापक डॉ. जांबेवर मॅडम , प्राध्यापक डॉक्टर पी. एन. वाघ, इत्यादी उपस्थित होते. वन्य जीवाचे संवर्धन ही भविष्यकाळाची गरज असून त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन याप्रसंगी प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.चुधरी यांनी वन्यजीव या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. किरमेरे यांनी वन्यजीवांचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.जम्बेवार मॅडम यांनी वन्यजीव व मानव यांचा परस्पर संबंध यावर विवेचन केले. प्रा. डॉ. दामोदर झाडे यांनी वन्यजीव प्राणी व जंगलतोड या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मानतेश तोंडरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. भैसरे मॅडम यांनी केले. आभार डॉ.धवनकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here