धानोरा : पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या

1386

महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)

– परिसरात खळबळ
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ४ ऑक्टोबर : तालुक्यातील कोवानटोला येथे पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या घटना आज ४ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिराबाई कूमरे (अंदाजे वय ३७) असे मृतक महिलेचे नाव आहे.
धानोरा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या जपतलाई गावानजीक कोवानटोला हे गाव आहे. येथील परसराम धानु कूमरे याने काल ३ ऑक्टोबर ला रात्रोच्या सुमारास पत्नी मिराबाई ला मारहाण करून कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या केली. सदर घटना आज ४ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास गावातील नागरिकांना लक्षात आली असता हत्या करण्यात आलेल्या मृतक महिलेच्या पतीला पकडून ठेवले व घटनेची माहिती पोलिसांना दिली. बातमी लिहेस्तव हत्येचे कारण कळू शकले नाही. सदर घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here