जारावंडी येथील बिएसएनएल मनोरा ठरत आहे शोभेचे वस्तू

274

– खासगी कंपनीची सेवा उपलब्ध करण्याची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
The गडविश्व
प्रतिनिधी/ पेंढरी : एटापल्ली तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जारावंडीतील बिएसएनएल सेवा डोकेदुखी ठरली असून भारत संचार निगम बोगस संचार निगम लिमिटेड बनली असल्याचे भ्रमणध्वनी धारकाकडुन बोलल्या जात आहे.
जारावंडी येथे भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यात आला आहे. मात्र सेवा योग्य दर्जाची मिळत नसल्यांनी हा मनोरा कुचकामी ठरला आहे, या मनोऱ्याला इंटरनेट सुविधाही दिलेली नाही आणि आता कॅल्लिंग सुद्धा होत नाही तर कधी कधी रेंजच ठप्प होत असल्याचा प्रकार घडत आहे, त्यामुळे बिएसएनएलवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जारावंडी येथील बिएसएनएल मनोर्‍यापासून केवळ एक किलो मीटर अंतरपर्यंतच कव्हरेज मिळते. जारावंडी भागात इंटरनेट वापरणार्‍यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ग्राहक ४९९ ते १००० रुपया पर्यंत रिचार्ज करीत असतात. या रिचार्जचा कालावधी २६ ते ४५ दिवसाचा असतो. मात्र बिएसएनएल च्या खंडीत सेवेमुळे केलेला रिचार्ज वाया जात आहे .यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. तसेच कॉल ड्रॉपचीही समस्या मोठ्या प्रमाणात आहे. सकाळ व सायंकाळच्या दरम्यान मोबाईल कॉल लागतच नाही. नेटवर्कमध्ये असतांनाही नेटवर्क क्षेत्राबाहेर असल्याचे सांगत असते. जारावंडी परिसरात जवळपास कोणतेही टॉवर किव्हा इंटरनेट ची सुविधा नसल्याने परिसरातील जनतेला आणि शेतकरी व विद्यार्थ्यांना शासकीय काम करुन घेण्यातही अडचण निर्माण होत आहे. काही कामाकरिता लोकांची धाव जिल्याकडे वळली आहे . परिसरात इंटरनेट सेवा नसल्याने परिसरातील शेतकर्‍यांना पीक कर्ज व अनेक योजनेचा लाभ घेण्यापासून सुध्दा वंचित राहावा लागत आहे

गंभीर समस्यांकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे

परिसर अतिदुर्गम व आदिवासी बहुल असल्याने अनेक गोष्टींचा अभाव आहे. जरी परिसर अतिदुर्गम असला तरी परिसरातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेत आहेत. सध्या उन्हाळ्याचे सुट्या लागल्याने काही विद्यार्थी गावाकडे परतले आहेत अशात त्यांना ऑनलाईन कामे आणि क्लास असल्याने व परिसरात इंटरनेटची सुविधा नसल्याने त्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. याचा चांगलास फटका
विद्यार्थ्यांना बसत आहे.
परिसरात एकच बीएसएनएलची सेवा असल्याने लोकांना त्याच्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. परंतु तेही कुचकामी ठरत असल्याने लोकांना अथक परिश्रम करावे लागत आहे. तयामुळे आता जिल्हाअधिकाऱ्यांनी या परिसरातील समस्या जाणून तात्काळ खासगी कंपनीच सेवा उपलब्ध करून द्यावी अशी कळकळीची मागणी खास करून परिसरातील विध्यार्थ्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here