जनसंवाद विभागाचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात साजरा

153

The गडविश्व
गडचिरोली, १९ ऑक्टोबर : सर्जनशीलता हा विद्यार्थ्यांचा अंगी असलेला असा गुण आहे जो विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मार्ग दाखवतो. प्रत्येक विद्यार्थी हा कलागुणांनी नटलेला असतो फक्त त्यांना एका विशिष्ट मार्गदर्शनाची गरज असते आणि जनसंवाद हे असे क्षेत्र आहे जे विद्यार्थ्यांच्या कलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते.असे मार्गदर्शन डॉ . प्रिया गेडाम सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग यांनी दीक्षारंभ या कार्यक्रमात केले.
‘दीक्षारंभ’ हा कार्यक्रम पदव्युत्तर शैक्षणिक जनसंवाद विभाग गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारे एम ए. जनसंवाद विभागातील विध्यार्थ्यांच्या स्वागतसाठी नुकताच आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या मुख्य वक्ता म्हणून डॉ . प्रिया गेडाम सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रजनी वाढई समन्वयक, जनसंवाद विभाग होत्या. कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादरीकरण करण्यासाठी संधी देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करत असताना विभागा कडून काय अपेक्षा आहे, याबाबत मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या ‘आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा: इंद्रधनुष्य-2022’ मध्ये फोटोग्राफी स्पर्धांमध्ये संजय सापरे या विद्यार्थ्यांला द्वितीय क्रमांक मिळाला त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.
डॉ.रजनी वाढई समन्वयक, जनसंवाद विभाग अध्यक्षस्थानावरून करताना म्हणाल्या की , भविष्यात वाटचाल करत असताना विविध कौशल्य विकासाची गरज असते. विद्यापीठातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित असल्याकारणाने विविध कलागुण विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. विद्यार्थ्यांनी जबाबदारीचे भान ठेऊन भविष्याची वाटचाल करावी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रुपाली अलोने, सहायक प्राध्यापक जनसंवाद विभाग यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी अमित कुमार राठोड एम. ए. प्रथम वर्ष आणि आभार हेमंत दूधबावरे एम. ए. प्रथम वर्ष यांनी केले.
दिक्षारंभ कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रुपाली अलोने आणि प्रा.गौरी ठाकरे यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here