– होड्री येथे ग्रापं समिती गठीत
The गडविश्व
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील होड्री येथे ग्रापं कार्यालयात सरपंच मीनाक्षी हबका यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करून मुक्तिपथ ग्रापं समिती पुनर्गठित करण्यात आली. तसेच घरगुती दारूचे प्रमाण कमी करण्यासाठी चर्चा करून कृतीचे नियोजन करण्यात आले.
यावेळी ग्रापं सचिव मारबते, , ग्रापं सदस्य मादी मिच्छा, चैतू वड्डे, कमला तिमा, रजनी मिच्छा, शकुंतला मडावी, मुख्याध्यापक मिच्छा, आशा वर्कर जोती विडपी, लालसू वड्डे, विष्णू विडपी, महारी वड्डे आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गाव दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली. ग्रापं कायद्यानुसार दारू व तंबाखू विक्री बंदीसाठी असलेले कायदे, अधिकार समजावून सांगण्यात आले. तसेच तंबाखू विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. घरगुती दारूचे प्रमाण कमी करण्यासाठी व अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी चर्चा करण्यात आली. दर महिन्याला ग्रापं समितीची बैठक घेण्याचे सुद्धा ठरविण्यात आले.