गडचिरोली : गोवंश तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या आवळल्या मुसक्या

1092

– टायगर ग्रृपच्या सहकाऱ्याने अहेरी पोलीसांची धडक करावाई
– ट्रक चिखलात फसल्याने डाव फसला

The गडविश्व
अहेरी ,३० जुलै : गडचिरोली जिल्हयातून गोवंश तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या अहेरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे. सदर कारवाई शुक्रवार २९ जुलै रोजी अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर येथे दुपारच्या सुमारास करण्यात आली. यात २७ गोवंशांना जीवनदान मिळाले आहे.
नागेपल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर एफडीसीएम कॉलनीत एपी २४ व्ही ०४२६ क्रमांकाचा ट्रक चिखलात फसला होता. दरम्यान मोठया वेगाने जाणाऱ्या या ट्रकमध्ये काहीतरी असल्याचा संशय आल्याने टायगर ग्रृपच्या सदस्यांनी ट्रकवर झाकेलेली प्लास्टीक खुले केले असता ट्रकमध्ये जनावरांना कोंबून वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. टायगर ग्रृपच्या सदस्यांनी लागलीच माहिती अहेरी पोलीसांनी दिली. यावेळी पोलीसांनी घटनास्थळ गाठून बघीतले असता ट्रकमधून गोवंश तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान पोलीसांनी ट्रकसह गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. ट्रकमध्ये एकुण २७ गोवंश असल्याचे कळते यामधील ८ गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर टायगर गृ्रपच्या सदस्यांनी उपचार केला व पोलीसांमार्फत जनावरांना गोशाळेत पाठविण्यात आले.
मार्गावरील रस्त्यावर अनेक जागी खड्डे पडले आहे. गोवंश तस्करी करणारा ट्रक या मार्गावर चिखलात अडकल्याने गोवंश तस्कारांचा डाव फसला आहे. सदर कारवाईने अवैध गोवंश तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here