– भुसंपादनाची प्रक्रिया उक्त कायदयाचे कलम ९३ अन्वये रद्द
The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑगस्ट : गोंडवाना विद्यापीठाची भुसंपादनाची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे अशी माहिती विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,गडचिरोली दर्शन निकाळजे यांनी कळविले आहे.
कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या करीता गडचिरोली नजीकच्या अडपल्ली येथील क्षेत्र ६४.८० हे.आर.खाजगी जमिन भुमि संपादन पुनर्वसन व पुर्नवसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कायदयानुसार भुसंपादन करण्याबाबतची कार्यवाही विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,गडचिरोली यांच्या कार्यालयात सुरु आहे. जिल्हाधिकारी ,गडचिरोली यांनी गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली करीता अडपल्ली ता.जि.गडचिरोली येथील खाजगी जमिनीची विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,गडचिरोली यांच्या कार्यालयाच्या स्तरावर उक्त कायदयानूसार सुरु असलेली भुसंपादनाची प्रक्रिया उक्त कायदयाचे कलम ९३ अन्वये रद्द केलेली आहे.
विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,गडचिरोली यांच्या कार्यालयाच्या स्तरावर गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली करीता उक्त कायदयानूसार सुरु असलेली भुसंपादनाची प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,गडचिरोली दर्शन निकाळजे यांनी कळविले आहे.