The गडविश्व
गडचिरोली २१ जुलै : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी गोंडवाना
विद्यापीठाच्या कुलसचिवपदाचा पदभार प्रभारी कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे यांच्या कडून स्विकारला.
डॉ. हिरेखन यांना प्रशासनिक कामाचा १९ वर्षांचा अनुभव आहे. नागपूर विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून कार्यरत होते.याशिवाय जून ते ऑगस्ट २०१५ ला परीक्षा नियंत्रक म्हणून कारभार सांभाळला. त्यांनी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी म्हणूनही सेवा दिली आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदावर एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या काळात ते कार्यरत होते.जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या काळात कुलसचिव (प्रतिनियुक्ती) म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.२०१५ साली नागपूर विद्यापीठाचे सर्वोत्तम अधिकारी म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे.
साडेतीन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून १९९९ ते २००३ या काळात रामटेकच्या कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे विद्यापीठ मान्यता प्राप्त प्राध्यापक म्हणून सेवा दिली आहे. ४ डिसेंबर २०२० पासून गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव पद रिक्त होते. त्यामुळे संचालक परिक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. अनिल झेंड. चिताडे यांच्या कडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. आज डॉ. अनिल हिरेखन यांनी या पदाचा पदभार स्विकारला.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यापीठाचे व्हिजन आणि मिशन आपल्याला साध्य करायचे आहे. तसेच विद्यार्थी हा विद्यापीठाचा कणा आहे. त्यामुळे त्यांना चांगली सेवा देणे हे महत्त्वाचेआहे.असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन सतिश पडोळे यांनी तर आभार संदेश सोनुले यांनी मानले.