–मुक्तीपथ तालुका टीमचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, ५ नोव्हेंबर : आरोग्याची समस्येसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरत असेल ते म्हणजे दारू व तंबाखू. या व्यसनांमुळे लोकांचे नुकसान होते एवढेच नाही तर कुटुंबाचा आर्थिक व आरोग्याचा स्तर घसरतोय. यासाठी अंगणवाडीत येणारे सर्व गरोदर माता व स्तनंदा मातांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवत तंबाखूमुक्त कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मुक्तीपथ तालुका टीमने केले.

एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली ग्राम पंचायतमध्ये जीपीडीपी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला विस्तार अधिकारी व्ही. एस.बोरीवार, विस्तार अधिकारी खोब्रागडे , तालुका संघटक किशोर मलेवार, गुरुपल्ली , तुमर्गुंडा, येमली येथील ग्रामसेवक, सरपंच व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
ग्रापं विकास आराखड्यात गावातील आरोग्य व स्वच्छता यावर माहिती देताना मुक्तीपथ तालुका संघटक किशोर मलेवार म्हणाले की, ग्रामपंचायत हा गाव विकासाचा महत्त्वाचा दुवा आहे. गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. यासाठी अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत व्यसनमुक्त करण्यासाठी दारु व तंबाखूमुक्तीच्या जनजागृती करिता तरतूद करावी. पेसा कायद्याची अंमलबजावणी करून घरघुती दारू बंद करावी, गावात दारू विक्रीमुक्त गाव असा फलक लावणे आदी माहिती देत दारू व तंबाखूमुक्त गाव व ग्रामपंचायतचे फायदे समजावून सांगितले. यावेळी दारू व तंबाखू व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष बाबी नियोजन आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या.