गडचिरोली : शहरातील धानोरा मार्गावर अपघात, एकजण ठार

317

The गडविश्व
गडचिरोली, २५ ऑक्टोबर : शहरातील धानोरा मार्गावरील बसस्थानक नजीक अज्ञात पिकअप वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना घडली सोमवार २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. दिलीप झपर ठाकुर (४३) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवार २४ ऑक्टोबर रोजी मृतक हा पायी जात असताना अज्ञात पिकअप वाहनाने त्याला धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना कळताच घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले. मृतक हा मूळचा नेपाळ येथील रहिवासी असून तो मागील ९ महिन्यापासून हनुमान वार्ड गडचिरोली येथे आपल्या रिश्तेदारांसोबत राहत होता असे कळते. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here