The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा क्रीडा संकुल समितीचे जलतरण तलाव लाॅकडाउनमुळे बंद होते. मात्र आता दुरुस्तीसह सुरू झाले असून पोहता येणारे विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, महिला, पुरुषांना प्रवेश देणे सुरू असून इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि शुल्क भरुन प्रवेश घ्यावा असे आवाहन जलतरण तलाव व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नियमित सुरू असलेल्या राज्यातील काही मोजक्या जलतरण तलावापैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुल समितीचा एकमेव जलतरण तलाव लाॅकडावउन आणि दुरुस्ती करीता बंद होते. आता जिल्हा क्रीडा संकुल समितीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत सुसज्ज फील्टर प्लाॅन्ट, निर्जंतुकीकरण यंत्रणा आणि बांधकाम विभागामार्फत नवीन टाईल्स आणि इतर कामे करण्यात आली आहेत. अनुभवी कंत्राटदार नेमून शहरातील नागरिकांना पोहण्याकरीता जलतरण तलाव उपलब्ध करून दिले आहे.
असे आहे वेळापत्रक
पोहता येणाऱ्यांकरीता सकाळी आणि सायंकाळी ६ ते ८ वाजता कोणत्याही एका तासाकरीता प्रवेश देणे सुरू आहे. तसेच पोहता न येणारे विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, महिला व पुरुषांना प्रशिक्षण शुल्क घेऊन सकाळी ८ ते ९ आणि सायंकाळी ४ ते ६ एका तासाकरीता पोहण्याचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.