गडचिरोली पोलीस भरती २०२२ ची लेखी परीक्षा १९ जून रोजी

1353

– आजपासून उपलब्ध होणार प्रवेशपत्र
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा पोलीस भरती दलामार्फत १३६ पदांची पोलीस शिपाई भरती आयोजित करण्यात आली आहे. सदर भारतीकरिता २१ मे पासून ५ जून पर्यंत आवेदन अर्ज स्वीकारण्यात आले. सदर भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांना उत्सुकता होती. आता ही उत्सुकता संपली असून पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही १९ जून २०२२ रोजी होणार आहे. सदर लेखी परीक्षेचे आज ११ जून २०२२ पासून प्रवेशपत्र (हॉल तिकेट) उपलब्ध होतील असे पोलीस दलामार्फत कळविण्यात आले आहे. तसेच उमेदवारांना दोन वेगवेगळ्या माध्यमातुन प्रवेशपत्र (हॉल तिकेट) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उमेदवारांनी ज्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें/पोलीस मुख्यालयामध्ये आवेदन अर्ज भरून सादर केले आहे. त्याच ठिकाणी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र मिळतील. तसेच उमेदवारांनी आपल्या अर्जात नमुद केलेल्या वैयक्तीक ई-मेल आयडीवर सदर लेखी परीक्षेचे प्रवेशप्रत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उमेदवारांनी प्रवेशपत्र तपासुण त्यात काही बदल असल्यास तसेच काही अडचणी उद्भवत असल्या त्यांनी समाधान कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मो. क्र. ८८०६३१२१०० या क्रमांकावर संपर्क साधावा जेणे करून आपल्या समस्येचे निराकरण केले जाईल असे सुद्धा पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here