गडचिरोली पोलीस दल व श्री. शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कार्यशाळा

396

The गडविश्व
गडचिरोली : सध्या कोरोना-१९ च्या सतत चालत असणाऱ्या बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार हे रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत असतांना त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच ताण-तणावाला बळी पडुन आपला जीव गमावुन बसत असतात. हे सर्व मानसिक त्रास तसेच ताण-तणाव कमी करण्यासाठी त्यांच्यावर होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांवर मात करून शरीर निरोगी व सुदृढ राहावे. या संकल्पनेतुन पोलीस अधिकारी / अंमलदार व त्यांचे कुटुंबियांकरीता पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील एकलव्य हॉलमध्ये गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप-महानिरीक्षक संदीप पाटील सा. यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशनचे आशीष कलावार (प्रमुख आचार्य, महाराष्ट्र) यांचा १४ मार्च २०२२ ला एक दिवशीय हिमालय मेडिटेशन वर्कशॉप वक्तव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर एक दिवशीय हिमालय मेडिटेशन वर्कशॉपला गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील सा., गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा. तसेच गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.या एक दिवशीय हिमालय मेडिटेशन वर्कशॉपमध्ये मोठया प्रमाणात पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांचे कुटुंबियांनी सहभाग घेवून मानसिक त्रास तसेच ताण-तणाव कमी होण्यास मदत होवुन मनाला शांतता व प्रसन्नता वाटल्याची ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here