– अनेक परिसर जलमय, पूरजन्य परिस्थिती निर्माण
The गडविश्व
गडचिरोली ( Gadchiroli), २१ सप्टेंबर : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्याला काल २० सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे अनेक परिसर जलमय होऊन पूरजन्य परिस्थिती पहावयास मिळाली. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्हयातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. गडचिरोली सर्कलमध्ये सर्वाधिक १९५.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यात काल ५२.४ मिमी तर १ जून पासून आतापर्यंत १७४७.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने जिल्ह्याला ५ दिवस येलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. गडचिरोली शहरात दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. किमान २० ते ३० मिनिट मुसधार पाऊस पडला व नंतर काही वेळ उसंत घेतल्यानंतर पुन्हा ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान पावसाने जोर धरत हजेरी लावत झोडपून काढले. जिल्ह्यातील अनेक परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने परिसर जलमय झाले होते. जिल्ह्यातील आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी, वडसा देसाईगंज, आदी परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक नागरिक मुसळधार पावसाने बाहेर अडकल्याचे पहावयास मिळाले होते. तर काही ठिकाणी रात्रभर पाऊस बरसला.
गडचिरोली शहरात मुसळधार पावसाने नेहमीप्रमाणे अनेक परिसर जलमय झाले होते, नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या, रस्त्यावर पाणी पहावयास मिळाले तर अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याचे कळते. एकंदरीत या पावसाने शेतकरी सुखावला असला तरी जिल्हाभरात पडलेल्या पावसाने पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होईल का ? २३ तारखेपर्यंत हवामान विभागाने येलो अलर्ट वर्तविल्याने पुन्हा मुसळधार पावसाने झोडपून काढल्यास पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
काल सर्वाधिक गडचिरोली सर्कलमध्ये १९५.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने गडचिरोली शहरातील अनेक भागात आज सकाळच्या सुमारास हि पाणी साचून होते. जिल्ह्याभरात काल ५२. ४ मिमी पावसाची नोंद झाली असून १ जून पासून अद्यापपर्यंत १७४७. २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुका नुसार पावसाची नोंद मिमी मध्ये
गडचिरोली १३९.८,कुरखेडा २८.९ ,आरमोरी ७६.३, चामोर्शी ५८.३, सिरोंचा २६.८, अहेरी ४७.९, एटापल्ली २९.९, धानोरा २५.९, कोरची १३.५, देसाईगंज १०३.० , मुलचेरा ३६.८, भामरागड ४२.६
सर्कल नुसार पावसाची नोंद मिमी मध्ये
सर्वाधिक गडचिरोली १९५.८, बामणी १९५. ८ , येवली १६५.४ तर पोर्ला ६७.६, आरमोरी १०५.० , देऊळगाव ११०.०, चामोर्शी १००. ०, कुनघाडा ९०.०, देसाईगंज ११२.०, शंकरपूर ९४.०
Gadchiroli Rainafall Heavy Rainfall