गडचिरोली जिल्हयात आज ४४ बाधितांची नोंद तर १९७ कोरोनामुक्त

161

The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 911 कोरोना तपासण्यांपैकी 44 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 197 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37080 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 35915 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 397 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 768 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एक नविन मृत्यूमध्ये चामोर्शी तालुक्यातील मांजेगांव येथील 65 वर्षीय पुरुष विविध आजाराने ग्रसीत व्यतीचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.86 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.07 टक्के तर मृत्यू दर 2.07 टक्के झाला आहे.
आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 10, अहेरी तालुक्यातील 08,आरमोरी तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 06, धानोरा तालुक्यातील 09, एटापल्ली तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील 06 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 197 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 21, अहेरी तालुक्यातील 03, आरमोरी तालुक्यातील 02, भामरागड तालुक्यातील 55, चामोर्शी तालुक्यातील 03, धानोरा तालुक्यातील 62, एटापल्ली तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 20, कुरखेडा तालुक्यातील 12, आणि वडसा तालुक्यातील 04 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here