खळबळजनक : शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी आयएएस अधिकाऱ्यास अटक

122

The गडविश्व
पुणे : राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेल विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
खोडवेकर हे शिक्षण विभागात 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत शिक्षण विभागात कार्यरत होते. खोडवेकर यांनी पैसे घेतले असल्याचे तपासांत समोर आल्याने खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. सायबर विभागाने खोडवेकर यांना ठाण्यातून अटक केली. खोडवेकर यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान याआधी या प्रकरणी पोलिसांनी तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर आणि प्रितीश देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here