ऑगस्ट क्रांती दिवस
आजच्या दिवशी- दि.८ ऑगस्ट १९४२ रोजी रात्रीपासूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्याची मनसुबे तयार झालीत. महात्मा गांधीजींनी छोडो भारत व करेंगे या मरेंगेचा नारा दिला होता. यामुळे संपूर्ण देश पेटून उठला. शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्या काँग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. ८ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणूनही स्मरण केला जातो. म.गांधींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला या दिवशी सुरुवात झाली होती. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी गांधींसह ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध एकवटला होता. देशावासियांच्या या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर क्रांती दिन साजरा केला जाऊ लागला. मुंबईतील ज्या मैदानावर झेंडा फडकावत या आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्या मैदानाला क्रांती मैदान हे नाव देण्यात आले आहे. भारतीयांनी पुकारलेला सन १८५७ नंतरचा हा सर्वात मोठा स्वातंत्र्य लढा होता. आज आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व नाम-अनाम क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करूयात !
देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी पुढे आंदोलनांना सुरवात झाली. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे? असा प्रश्न त्यांना पडला होता. अशात हे आंदोलन देशभर पसरणार म्हणून ९ ऑगस्टच्या पहाटेच म.गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह अनके काँग्रेस नेत्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले. भारतीय जनमानसात असंतोषाचा विस्फोट झाला, त्यामुळे ब्रिटिश शासन भयभीत झाले. एकाच वेळी देशभर कारवाया सुरू झाल्या व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक सत्र सुरू केले अनेक नेते भूमिगत झाले. देशभर पोलीस ठाण्यावर व मामलेदार कचेरीवर, सरकारी कार्यालयांवर मोर्चे निघू लागले. युवक हातात तिरंगा झेंडा घेऊन घोषणा देत लाठीचार्ज व गोळीबार झेलत धैर्याने तिरंगा फडकवू लागले. समाजवाद्यांनी भूमिगत कारवायांवर लक्ष केले. रेल्वे स्थानके मोडतोड, रूळ उखडणे, पोस्ट कार्यालय जाळणे, वीज तोडणे, गनिमी पद्धतीने ही कामे सुरू झाली. पोलिसांकडून अटक सत्र सुरू झाले. व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, सामान्य नागरिक, स्त्री-पुरुष सर्व या आंदोलनात सहभागी झाले. देशभरातील युवकांनी यात भाग घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्फूर्तीदायी ठरलेल्या या दिवसाची आठवण तसेच नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव रहावी, यासाठी दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिन साजरा केला जातो.
देशभर स्वातंत्र्याचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. चले जावमुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रात प्रतिसरकारची स्थापना केली. हे आंदोलन उभे राहण्याआधीच ब्रिटिश सरकारने मोडून काढण्याचे ठरवले होते. त्या पद्धतीने देशभर कारवाया केल्या व आंदोलन मोडून काढले. परंतु या आंदोलनाने जगाला वेगळी ओळख दिली. कारण कोणताच सेनापती नसताना स्वातंत्र्याचे युद्ध जनतेने हातात घेतले होते. यामुळेच भारताच्या स्वातंत्र्याचा विचार केला जाऊ लागला, हे विशेष. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दि.९ ऑगस्ट १९४२ या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तत्कालीन कॉंग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला चले जावचा इशारा दिला. या दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणार्या भारतीयांनी करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची भूमिका घेतली. इंग्रजांना छोडो भारत हा अखेरचा इशारा दिला होता. या आंदोलनाला गांधीजींनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई अधिवेशनात सुरूवात केली होते. यामुळे जणू एक क्रांतीची जोतच पेटली होती. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान देणाऱ्या सर्व थोर पुरूषांना विनंम्र अभिवादन !
देशभरात ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे. इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती. ८ ऑगस्ट १९४२ रोजी भारताला स्वतंत्र करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते. मात्र ऐनवेळी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे म.गांधींनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला भारत छोडो, असे नाव देण्यात आले होते. करो या मरो, अशी या आंदोलनाची घोषणा होती. शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस आणि थोर नेत्यानी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे ९ ऑगस्ट हा दिवस क्रांतिदिन म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र, इतकी कठोर भूमिका घेतल्या नंतर पाच वर्षानी आपल्याला स्वातंत्र्य लाभले. दि. ९ ऑगस्ट १९४२ ते १५ ऑगस्ट १९४७ हा कालावधी प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवायला हवा, इतका तो ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे. दरम्यान, गांधींच्या नेतृत्वात इंग्रज सरकारविरुद्ध फार मोठ्या प्रमाणावर देशभर अहिंसक जनआंदोलन लवकरच उभे राहील, अशा शब्दांत महासमितीने आपला निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळेच गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, अशा ज्येष्ठ नेत्यांना ९ ऑगस्टच्या पहाटेच इंग्रज सरकारने अटक करून अज्ञातस्थळी रवाना केले होते. सरकारने त्यांना कुठे ठेवले ह्याची गुप्तता पाळली होती. मात्र, तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आल्याचे समजले. देशभर जागोजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आले. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले. यासर्व प्रकाराला सरकारने गांधीजींना जबाबदार ठरवले. त्याचा निषेधार्थ गांधीजीने २१ दिवसांचे अंदोलनही केले होते. प्रतिसरकारमुळे मूळ सरकार खवळेले आणि त्यांनी दडपशाही सुरू केली. त्यात हजारांहून अधिक मृत्यू, तितकेच जखमी, महिलांची विटंबना तर लाखोंना अटक केली होती, अशा नोंदी आहेत. ही चळवळ युद्धासारखी होती. या लढाईत योगदान देणाऱ्या सर्व प्रकारच्या क्रांतिलढ्यांना वंदन !
दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत केली. त्यावेळी इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचे वचन दिले होते. मात्र ऐनवेळी दिलेला शब्द न पाळता इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यास नकार दिला. त्यामुळे दि.८ ऑगस्ट १९४२ रोजी भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबईतील अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानंतर इंग्रजांनी गांधींजींना पुण्यातील आगा खाँ तुरुंगात कैद केले. तसेच, स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांनाही अटक करण्यात आली. त्यावेळी तरुण कार्यकर्त्या अरुणा असिफ अली यांनी ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानात तिरंगा फडकावत भारत छोडो आंदोलनाचा शंखनाद केला. मात्र, गांधीजींनी हेही आंदोलन अहिंसक मार्गानेच करावे, असे आवाहन देशवासियांना केले होते. तरीही देशातील अनेक भागात हिंसा आणि तोडफोड करण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटीश सरकार अगोदरच खिळखिळे बनले होते. तर या आंदोलनामुळे ब्रिटीशांची उरली-सुरली ताकदही लोप पावत गेली. त्यानंतर देशवासियांनी इंग्रजांना हाकलून लावेपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवले. भारताला दि.१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. या आंदोलनात आपले बलिदान देणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून हा ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो.
!! The गडविश्व परिवारातर्फे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सर्व देशप्रेमी भारतीयांना वंदे मातरम् !!
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार.
गडचिरोली, फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८३.