– चिमुकलीसह ६ जण जखमी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, २४ ऑक्टोबर : कुरखेडा-कोरची मार्गावर डोंगरगाव फाट्यानजीक तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना रविवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात १ युवक ठार तर एका ३ वर्षीय चिमुकलीसह ६ जण गंभीर जखमी झाले.
पंकज फुलचंद मडावी (२५) रा. गांधीनगर (नान्ही) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे तर मृतकाचे वडील फूलचंद मडावी (५८), विलास कुंजाम (२४) रा. गांधीनगर, रूबी हरीप्रसाद शाहू (३), हरीप्रसाद शाहू (३०), गोदावरी शाहू (२५), सोनिया शाहू (२५) सर्व रा. गरीपार, ता. छुरिया जि. राजनांदगाव (छत्तीसगढ) हे गंभीर जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार, मृतक पंकज हा वडील व मित्रासह एका दुचाकीने कोरची येथून कुरखेडाकडे येत होता. व चंद्रपूर येथे बांधकाम कामावर असेलेले छत्तीसगढ येथील काही मजूर दोन दुचाकीने दिवाळी सणाकरिता गावी जात होते. दरम्यान, डोंगरगाव फाट्यानजीकच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. तसेच याचवेळी मागून येणारी तिसरी दुचाकीसुद्धा या वाहनांना धडकली. या विचित्र अपघातात एक ठार, तर ६ जण जखमी झाले.
अपघाताची माहिती होताच मृतक व जखमींना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे भरती करण्यात आले.
अपघाताने मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

#gadchirolinews #accident #kurkheda #korchi #roadaccident