उमानुर व चिचोली येथे व्यसन उपचार शिबीर, ३७ रुग्णांनी घेतला लाभ 

104

The गडविश्व
गडचिरोली, ३० ऑक्टोबर : जिह्यातील उमानुर व चिचोली येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही शिबिरांच्या माध्यमातून एकूण ३७ रुग्णांनी उपचाराचा लाभ घेतला. सोबतच दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्याचा निर्धारही केला आहे.

अहेरी तालुक्यातील उमानुर येथे एकदिवसीय व्यसन उपचार शिबीर घेण्यात आले. यात २० रुग्णांनी नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. रुग्णांची केस हिस्ट्री सायोजिक पूजा येल्लुरकर तर समुपदेशन साईनाथ मोहुर्ले यांनी केले. शिबिराचे नियोजन व आयोजन तालुका प्रेरक आनंदराव कुम्मरी व स्वप्नील बावणे यांनी केली. शिबिरासाठी ग्रामपंचायत सदस्य मोंडी पानेम यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.

धानोरा तालुक्यातील चिचोली येथे आयोजित शिबिरात १७ रुग्णांनी पुर्ण उपचार घेतला. केस हिस्ट्री संयोजक छ्त्रपती घवघवे यांनी घेतली. समुपदेशक . प्राजक्ता मेश्राम यांनी दारूची सवय कशी लागते, धोक्याचे घटक, दारूचे दुष्परिणाम आदीसंदर्भात रुग्णांना मार्गदर्शन करीत दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. शिबिराचे आयोजन व नियोजन मुक्तिपथचे भास्कर कडयामी व राहूल महाकुलकर यांनी केले. यशस्वीतेसाठी तंमुस अध्यक्ष ऋषी कूमोटी, गाव पाटील तुळशीराम कुमोटी, प्रतिभा शेंडे, ललिता जेंगटे, कुसुम सोनुले, सुनिता शिरसागर यांच्यासह गाव संघटनेच्या महिलांनी सहकार्य केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here