उप पोलीस स्टेशन पेंढरी येथे दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य जनजागरण मेळावा संपन्न

560

– ५० गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

The गडविश्व
गडचिरोली / पेंढरी : उप पोलीस स्टेशन पेंढरी येथे दादालोरा खिडकीच्या माध्यमातून काल २१ एप्रिल रोजी भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यात उपस्थित ५० गरजू नागरिकांना साहित्यांचे वितरण करण्यात आले तसेच विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर मेळाव्याचे आयोजन पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख सा.(प्रशासन), अपर पोलीस अधीक्षक (अभि) सोमय मुंढे सा.यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ सा. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सीआरपीएफचे असि.कमांडट संजय भुजबळ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, सामाजिक कार्यकर्ते किरण शेडमाके तसेच पोस्टे प्रभारी अधिकारी पो.उप.नि.सागर पेंढारकर सा., पो उप.नि.धम्मदिप काकडे, पेंढरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोउपनि पेंढारकर यांनी केले. प्रास्ताविकेत गडचिरोली पोलीस प्रशासन अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना बाबत मार्गदर्शन केले.तसेच दुल्लमवार यांनी ‘जनतेमध्ये पोलीसांची असलेली जबाबदारीची भूमिका’ याबाबत विचार मांडले. तसेच किरण शेडमाके यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेला आवाहन केले. उपस्थितांपैकी ५० गरजू नागरिकांना १० साडी, १० बकेट, १० धोतर पान, १० टफ, १० टाॅवेल असे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच मातृत्व वंदन योजनेचा ०६ मातांना लाभ मिळवून देण्यात आला, नविन बॅक खाते- १९, जीवन ज्योती विमा – ०८, सुरक्षा विमा योजना -१५, संजय गांधी निराधार- ०२ प्रस्ताव, श्रावणबाळ योजना – ०१, जाॅबकार्ड – २१ इत्यादी योजनांचे लाभ दादालोरा खिडकीच्या माध्यमातून उपस्थित जनसमुदायास देण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार पेंढरी चे पो.उप.निरीक्षक धम्मदिप काकडे यांनी मानले. मेळाव्याची सांगता सहभोजनाने करण्यात आली आहे. सदर मेळाव्यात ३००-३५० नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here