उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते अतिदुर्गम भागातील पोमके कटेझरीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा शीलान्यास सोहळा संपन्न

194

– नक्षलविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सी-६० जवानांचा केला सत्कार
– नागरिकांना नित्योपयोगी वस्तुंचे वाटप
The गडविश्व
गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आज २९ एप्रिल २०२२ रोजी गडचिरोली जिल्हया दौरा पार पडला. यावेळी उत्तर गडचिरोलीच्या टोकावरील महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेलगत असलेल्या उपविभाग धानोरा अंतर्गत पोमके कटेझरी येथे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन आयोजित केलेल्या जनजागरण मेळाव्यास उपस्थित राहुन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पोमके कटेझरी येथे नविन इमारतीचा शिलान्यास सोहळा पार पाडला.यावेळी पोमके-कटेझरी अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकी, सुरक्षा गार्ड (मोर्चा), पोलीस अधिकारी व अंमलदारांचे बॅरेक, अंमलदारांचे खाजगी घर, इत्यादींना भेट देवून पोलीस मदत केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच मेळाव्यात उपस्थित गरीब गरजु नागरिकांना तिनचाकी सायकल, लेडीज सायकल, शिलाई मशिन, फवारणी पंप, डिशटिव्ही, साऊंड सिस्टिम, शामियाना, सोलर पंप, सिन्टेक्स झेरॉक्स मशिन, प्लॉस्टिक खुर्ची, कपडे, खोदकामासाठी लागणारे साहित्य, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी तसेच शालेय मुलांना उपयोगी वस्तु व इतर भेटवस्तु दिल्या. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना गडचिरोली जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटिबध्द असुन, येथील सामान्य जनतेस जनप्रवाहात आणुन सर्व नागरी सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत आश्वासित केले तसेच जनतेनी नक्षलवाद्यांच्या भुलथापांना बळी पडु नये असे सांगितले. यावेळी कटेझरी परिसरातील ५०० ते ६०० नागरिक मेळाव्यास उपस्थित होते.त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील एकलव्य धाम येथे भेट देवून नक्षलविरोधी अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र व मोमेंटो देवुन सत्कार केला. यावेळी सी-६० पथकाचा कमांडो भत्ता दुप्पट करुन दिल्याबद्दल सी-६० पथकाच्या प्रमुखांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सत्कार करुन आभार मानले. यावेळी उपमुख्यमंत्री सा. व गृहमंत्री सा. यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या मागिल कामगिरीचा आढावा घेवुन, उत्कृष्ट कामगिरीबाबत शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र शासन गडचिरोली पोलीस दलाच्या नेहमी पाठीशी असल्याचे सांगितले.यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक शसंदिप पाटिल सा., गडचिरोली परिक्षेत्र, जिल्हाधिकारी संजय मिना सा., पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे सा. उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here