– महाविद्यालयाने गेल्या पाच वर्षातील बाबीशी केली चर्चा
The गडविश्व
आरमोरी (Armori), १३ सप्टेंबर : येथील महात्मा गांधी महाविद्यालयाला ७ व ८ सप्टेंबरला नॅकच्या त्रिसदस्यीय समितीने समितीने भेट दिली. यादरम्यान महाविद्यालयाने गेल्या पाच वर्षातील बाबीशी केली चर्चा केली.
यावेळी नॅक पीअर टिम अध्यक्ष डॉ. शरणमा हलसे, नॅक पीअर डॉ. डी. एस. दहिया, नॅक पीछार टिम सदस्य डॉ अजय सक्सेना उपस्थित होते. दरम्यान करिक्युलर आस्पेक्ट टिचिंग लर्निंग अँड इव्हाल्युएशन, रिसर्च, कंसलटन्सी अँड एक्सटेंशन, इन्फ्रास्ट्रक्चर अँड लर्निंग रिसोर्सेस, स्टुडंट सपोर्ट अँड प्रोग्रेशन, गवर्नन्स, लिडरशीप अँड मॅनेजमेंट, इनोवेशन अँड वेस्ट प्रॅक्टीसेस अशा विविध निकषानुसार जे कार्य केले गेले त्याचे गुणात्मकदृष्ट्या पडताळणी करून कागदपत्रांची तपासणी केली. शिवाय महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतर्गत पदवी, पदव्युत्तर विभागांना आणि रिसर्च सेंटर्सला भेट दिली. पालक तसेच माजी विद्यार्थी व आजी विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधला. महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाजाची पडताळणीही केली. मॅनेजमेंटशी संवाद साधला.
