आयबीपीएस क्लर्क प्रीलिम्स परीक्षा 2021 चा निकाल जाहीर

174

The गडविश्व
मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) यांनी आयबीपीएस क्लर्क प्रीलिम्स परीक्षा 2021 चा निकाल जाहीर केला आहे. ibps.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहाता येणार आहे. परीक्षेला उपस्थित असणारे उमेदवार संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहू शकतात अथवा डाऊनलोड करु शकतात. 19 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवार ibps.in या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात.
आयबीपीएस क्लर्क प्रीलिम्स परीक्षा डिसेंबर 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठड्यात लागेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण आयबीपीएस परीक्षेचा निकाल 13 जानेवारी, गुरुवारी जाहीर करम्यात आला आहे. उमेदवारांना आणखी थोडावेळ वाट पाहावी लागणार आहे, कारण मुख्य परीक्षेसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here