आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश : किमान आधारभूत धान खरेदीस 8 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

380

The गडविश्व
देसाईगंज : पणन हंगाम 2021 -22 मधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरीप हंगामातील धान खदेरीला 31 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी धान खरेदीस मुदतवाढ देण्याची मागणी शासनाकडे रेटून धरली होती. या मागणीला यश आले असून किमान आधारभूत धान खरेदीस 8 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. याबाबतचे शासन निर्णय पत्रक प्राप्त झाले आहे.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त असून ऑनलाईन प्रक्रिया करतांना इंटरनेट कनेक्टीवीटी मिळत नाही. मध्यंतरी शासनाने शेतकऱ्यांना स्वत: इ पिक पाहणी अहवाल सादर करण्यास सांगितले यादरम्यान शेतकऱ्यांच्या बराच वेळ खर्ची झाला होता. विविध अडचणीमुळे शेतकऱ्यास वेळीत सातबारा मिळत नसल्याने बहुतेक शेतकरी आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धानविक्री पासून अजूनही वंचीत आहेेत. याकरीता शेतकऱ्यांकडनू धान खरेदीला मुदतवाढ करण्याची मागणी जोर धरत होती. सदर मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी शासनाकडे निवेदनातून रेटून धरली. शासनााने या मागणीची दखल घेत तसेच ३१ जानेवारी पर्यंत सदर खरेदीचे उद्ष्टि शिल्लक असल्याचे दिसून आल्याने त्याचप्रमाणे सोबत जोडलेल्या सुमारे ३० हजार शेतकऱ्यांचे शेडूलींग न झाल्याने त्यांच्याकडील धान खरेदी अद्याप न झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत शासन निर्णयानुसार अटी व शर्तीने धान खरेदीस मुदतवाढ करण्यात आली आहे.
धान खरेदीस मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे तर शेतकऱ्यांकडून मुदतवाढीचे श्रेय आमदार कृष्णा गजबे यांना देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here