– पर्यावरण संवर्धनाची घेतली शपथ
The गडविश्व
गडचिरोली, १५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत ९ ते १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्याने स्थानिक गडचिरोली नगर परिषदेतर्फे १४ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता नगर परिषदेच्या उद्यानात वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला मुख्याधिकारी विशाल वाघ तसेच सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमाला नगर परिषद गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांचे हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले व प्रत्येक अधिकारी/कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक झाड दत्तक देण्यात आले.
सदर कार्यक्रम मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला गेला.