The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीस ७५ वर्ष होत असल्याचे औचित्य साधून देशभरात ‘ आझादी का अमृत महोत्सव ’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करत असताना महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण हे महत्वाचे घटक आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व देशाची वाटचाल पुढे नेताना महिलांचा वाटा मोलाचा आहे.
त्या अनुषंगाने ‘ आझादी का अमृत महोत्सव ’ अंतर्गत ‘ स्वराज्य महोत्सव ’ निमित्त नगर परिषद, गडचिरोली तर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन नगर भवन सभागृहात शुक्रवार १२ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ११.०० वाजता करण्यात आले होते. महिलांनी थोडी थोडी मासिक बचत करत असतांना उद्योग व्यवसायाच्या संधी शोधल्या पाहिजेत, बाजारपेठेची गरज, कच्चा माल पुरवठादार, मार्केटिंग चे कौशल्य आत्मसात करून जास्तीत जास्त महिलांनी व्यवसायात पदार्पण करून कुटुंबात हातभार लावावा व अभियान यशस्वी करावे असे प्रतिपादन न.प. मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी अध्यक्षीय संबोधनात केले.