आजादी का अमृत महोत्सव तथा महाराजस्व अभियान शिबिरामध्ये १३ रक्तदात्यानी केले रक्तदान

112

The गडविश्व
येनापूर : आजादी का अमृत महोत्सव तथा महाराजस्व अभियान शिबिर येणापुर अंतर्गत १ जून रोजी तहसील कार्यालय चामोर्शी, महसूल मंडळ येनापुर आणि जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येनापुर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात एकूण १३ रक्तदात्यानी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली.
जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासू नवे व वेळेवर गरजू व्यक्तीला रक्त मिळवून देण्याकरिता रक्तदाते शोधण्याचा व जनजागृती करण्याचा प्रयत्न या सामाजिक संस्थेतर्फे सुरू आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये रक्तदान करण्याविषयी जनजागृती करून रक्तदान शिबिरे आयोजीत करण्यात येत आहे. सदर रक्तदान शिबिर महाराजस्व अभियान शिबिर इंदिरा गांधी कनिष्ठ महविद्यालय, येनापुर या ठिकाणी आयोजित करण्यात आले.
रक्तदान करणाऱ्यांमध्ये विनोद ढोरे, ओमकार सहारे, अर्जुन कोठारे, उमाकांत बोधे, राजेश्वर मडावी, परशुराम कस्तुरे, विराज वासेकर, आशीष मोषेलिये, अमित ठेंगणे, अनिल आभारे, मंगेश पेंदोर, विजय तलांडे, बादल सरकार, यांनी सदर शिबिरात रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटक म्हणून चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तमजी तोडसाम, अध्यक्ष म्हणून तहसिलदार संजय नागटिळक तर प्रमुख अतिथी म्हणून मुलचेराचे तहसिलदार हटकर, प.स.चामोर्शी व संवर्ग विकास अधिकारी नखडे, सोमनपल्लीचे सरपंच नीलकंठ निखाडे, विस्तार अधिकारी काळबांधे, येणापुर चे मंडळ अधिकारी नवनाथ अतकारे, प्राचार्य अशोक वाकुडकर, तलाठी सुधीर बावीस्कर, ज.ग्रा.वि. संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्र बंडावार, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here